तसाच आहे II


पुढे गेला काळ I मनाच्या तळाशी गाळ I
काय सांगू देवा I तसाच आहे II

पांढरे झाले केस I तरीही हासणारा फेस I
काहीही केले तरीही I तसाच आहे II

जुना जाणता शाहारा I जुन्या भावनांचा पाहारा I
कितीही उठवा त्याला I तसाच आहे II

आठवणीतला मोर I मनातला पाऊस घनघोर I
दुष्काळातही बाहेरच्या I तसाच आहे II

आता म्हणावे बाय I घ्यावा काढता पाय I
कितीही ठरवले तरीही I तसाच आहे II

K Sarang

मुखवटा


जमली गर्दी
जमले दर्दी
कसे वागाल
मुखवटा घाल

पहिली भेट
हृदय टार्गेट
काय बोलाल
मुखवटा घाल

पोटाचा प्रश्न
बोलणं तिक्ष्ण
काय घ्याल
मुखवटा घाल

एकटे बसुन
स्वतःस तपासुन
काय पाहाल
मुखवट्यांचा जंजाल

मुखवटे संपले
श्वास संपले
काय ओढाल
मुखवटा घाल

K Sarang

जरा जपुन टाक की पाऊल…


ठिणगीचा होण्या वणवा, आधीच राखेची लागली चाहुल
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

मुद्दे तुझे मनास भिडले
बदलाचे ढग जणु गडगडले
वाटले बदलेल आता हा खेळ
स्वप्नवत परिवर्तनाची हीच ती वेळ

कुणास ठाऊक कुठे शिंकली माशी, उच्चशिक्षित असुनही तू वाटला राहुल
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

पडतेच बाळ चालताना थोडे
धावू लागते मग ते झाले कि घोडे
धरा थोडा धीर काय आहे घाई
भरारी घेण्या अगोदर थोडं चाला नं पाई

आपटण्यापेक्षा कासवाच्या गतीने जा पण मिळव यश अतुल
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

तोंडावर थोडा लगाम अन कृती कडे लक्ष
या घटकेला इतकच केलत तरीही मजबूत राहील पक्ष
आमचं प्रेम आहे पाठीशी इतकं असुद्या ध्यानी
उगारलेली तलवार काही न करता नका घालू रे म्यानी

मोदींसारख झटल्याशिवाय होत नाही रे माहुल (माहोल)
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

K Sarang

अच्छे दिन…


नवीन नेता नवीन दिशा
जुन्या अपेक्षांचा ढोल ताशा

नवीन जल्लोष नवीन आरती
जुन्याच रथाचे नवीन सारथी

नवीन युद्ध नवीन रणनीती
जुनेच शत्रू जुनीच भीती

नवीन गाणे जुनाच ठेका
जुन्याच प्रेक्षकांवर नव्याने फेका

कदाचित यंदा थांबेल खेळ
नेहेमिच वाटते प्रत्येक वेळ

देखे इस बार क्या गुल खिलने वाले है
अशा है अच्छे दिन वाकाई आने वाले है

K Sarang

बोलो झं र र र र र र र र…


नमोनी पिचकारीत भरला चहा
केजरीनी टोपीत लपवला चिखल पहा
युवराजांच्या हातात मात्र बेरंग गुलाल
कुणावर टाकू याचा चेहऱ्यावर सवाल
भरपूर धुळवड अन भरपूर चिखलफेक
कुणाचा चिखल बारा गल्लीत चर्चा अनेक
होळीच्या सणा अधीच सुरु झाली होळी
भांडण लावून ते मस्त भाजताहेत राजकारणाची पोळी
भांडायचं कशाला इथे सगळे आहेत हुशार
मत मांडा , मत द्या पण लादू नका हा नेक आहे विचार
आता आली आहे होळी तेव्हा खरा रंग लावू
नमो केजरी पप्पू च्या नावाने मस्त होळी गाऊ
बोलो झं र र र र र र र र ….

K Sarang