ठिणगीचा होण्या वणवा, आधीच राखेची लागली चाहुल
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

मुद्दे तुझे मनास भिडले
बदलाचे ढग जणु गडगडले
वाटले बदलेल आता हा खेळ
स्वप्नवत परिवर्तनाची हीच ती वेळ

कुणास ठाऊक कुठे शिंकली माशी, उच्चशिक्षित असुनही तू वाटला राहुल
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

पडतेच बाळ चालताना थोडे
धावू लागते मग ते झाले कि घोडे
धरा थोडा धीर काय आहे घाई
भरारी घेण्या अगोदर थोडं चाला नं पाई

आपटण्यापेक्षा कासवाच्या गतीने जा पण मिळव यश अतुल
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

तोंडावर थोडा लगाम अन कृती कडे लक्ष
या घटकेला इतकच केलत तरीही मजबूत राहील पक्ष
आमचं प्रेम आहे पाठीशी इतकं असुद्या ध्यानी
उगारलेली तलवार काही न करता नका घालू रे म्यानी

मोदींसारख झटल्याशिवाय होत नाही रे माहुल (माहोल)
आस लावून बसलो रे केजरी, जरा जपुन टाक की पाऊल

K Sarang