आईस दर्जा देवीचा
बहिणीस दिलखुलास मैत्रिणीचा
बायको सखी आयुष्यभराची
मुलगी मात्र सगळ्यात मोलाची

जन्मास घालते आई
वळण लावते आई
पाया आयुष्यभराचा
रचून ठेवते आई

बहिण असते पाठराखीण
बहिण प्रामाणिक मैत्रीण
कडू गोड खोड्यान्मधून
घट्ट होते नात्याची वीण

बायको सोबती जन्माची
बायको प्रवासी प्रेमाची
बायको भाषा अंतरीची
तिच्यावीण यात्रा दुःखाची

मुलगी म्हणजे काळीज
मुलगी सुखाची बेरीज
मुलगी माझं सर्वस्व
नाही अस्तित्व तिच्याखेरीज ‘

स्त्रिया चार आयुष्यातल्या
वेगवेगळ्या वळणी मज भेटल्या
महती त्यांची शब्दांपलीकडली
तरीही प्रयत्ने या ओळी रेखाटल्या

8th March 2014…हैप्पी वुमेन्स डे…!

K Sarang