क्षणांचे सोहळे
काही सोवळे
नशीब कदाचित

जास्त रात्री
दिवस एकपात्री
नशीब कदाचित

भरलेला फळा
पाटिवर भोपळा
नशीब कदाचित

आनंदाचा तुकडा
चिंतेने साफ सुपडा
नशीब कदाचित

नशिबाला दोष
गोठला शब्दकोष
नशीब कदाचित

K Sarang