(Valentine Day celebration खास वऱ्हाडी भाषेत )

मले बी वाटे का तिया संग बोलाव
पन थे बोले विंग्रजी अन मंग कसं तिले झेलावं

तिया जवळ गेलं का म्हनते “How do you do ?”
आता मले का समजते मी करतो नुसता “हु हु”

एकदा गेल्तो बागेत तिथं होती थे बसली
अन जशी मले दिसली माई बोबडीच सरकली

दान्याच्या घेतल्या दोन पुड्या अन म्हनल तिले देऊ
तर च्या बहिन म्हनते कशी “Who are you?”

मंग मले भल्ला गुस्सा आला, म्हनल पुड्याच फेकून देऊ
त थेच माया जवळ येउन म्हनते कशी “I love you !!!”

भूषण जळीत आणि सारंग कुसरे