लाविल मी ज्योती | अंधाऱ्या मना |
सापाचा मी फणा | ठेचील ||

पतंगासवे उंच | घेईल भरारी |
तरीही स्वतःस माघारी | ठेवील ||

यातना मनास | होतील रे खोल |
जगण्याचे मोल | ठरवील ||

प्रश्ना परी प्रश्न | नाही कशाची उत्तरे |
तरीही आनंदी लख्तरे | मिरवील ||

काय करू रे विठ्ठला | कि होईल रे भेट |
“लक्ष्यात” माझ्या लक्ष तू | देशील? ||

K Sarang