प्रश्नांनी पुरता निघाला सोलुन
असंबद्ध काहीतरी आला बोलुन
अरे थोडा तर ठेवायचा प्रश्नांचा मान
कायको ली रे बच्चे कि जान…

नसतील येत उत्तर तर सांगावा नं स्पष्ट
उसन्या अवसानाचे कश्यास करावे कष्ट
नादात त्या गेला न जोरात पिळल्या कान
कायको ली रे बच्चे कि जान…

कुठल्याही प्रश्नाचे तेच ते उत्तर
चिडला नाही तो तुझे नशीब बलवत्तर
आलाच कशाला ठेवायची होतीस झाकली मुठ बंदच छान
कायको ली रे बच्चे कि जान…

शिकला असशील काही तर घरीच बसून राहा
मुलाखात आपली एकदा परत बसून पहा
जागा हो तुझ्या हातातच आहे तुझ्या समूहाची कमान
कायको ली रे बच्चे कि जान…

दिसत असुनही ठळक सारे
नातलग आप्तेष्ठ तरीही देती पहारे
बास झालं आता लोकच तुमच्या तोंडाला पुसतील पान
कायको ली रे बच्चे कि जान…

K Sarang