पंजा जेवतो गरिबा घरी
कमळ सोडते पुड्या भारी
तरीही केरसुणीची लोकप्रियता उसळली अफाट
बोलो ओह्ह्ह्ह्ह काट…

भल्याभल्यांनी केली थट्टा
खोटे पाडण्या केला नट्टा-पट्टा
राज जनतेने शेवटी त्यांची लावली वाट
बोलो ओह्ह्ह्ह्ह काट…

आवाजात त्याच्या कळकळ अशक्य
सत्येच्या मार्गाने सगळेच शक्य
म्हणुनच तर थेंबाची होतेय लाट
बोलो ओह्ह्ह्ह्ह काट…

जरी म्हणे तो, तो नसे आम
तो आल्यापासून इतर चोळती डोक्यास बाम
या कामाकरिता त्यास देतो तिळगुळाचे ताट
बोलो ओह्ह्ह्ह्ह काट…

थोर मोठ्यांची लागली रांग
व्याप्ती कुठवर जाईल याचा नाही थांग
परिवर्तनात व्हा सहभागी, कसली बघताय वाट
बोलो ओह्ह्ह्ह्ह काट…

K Sarang