दिवस उगवून मावळून गेला
फास अधिकच आवळून गेला

फरक कोणत्या नात्यास पडणार
नकळत आपसुक न्याहाळुन गेला

क्षणिक फुलांची मोहिनी घालत
कैफात चौफेर गंधाळून गेला

स्वर्ण उषेची लाट ओसरता
जातांना सागर सावळून गेला

निशेचा काळोख झोपेत घोळून
गजर्यात एक फुल आणिक माळून गेला

दिवस उगवून मावळून गेला
फास अधिकच आवळून गेला

K Sarang