WhatsApp वर लागू लागली आमची “सायं शाखा”
“दक्ष” आणि “आरमः” च्या emoticons मधुन हाका
Android based खेळच मग शाखेत खेळतो सारे
“Angry Advani”, “Ayodhya Run” खेळतो देत हिंदुत्वाचे नारे
“गण मंडल” चा येता message सगळ्यांचे थांबतात खेळ
जो न करी आदर आज्ञेचा,येई त्यावर online “कुची” ची वेळ
आडव्या प्रणामा करिता बनवला अंगठ्याचा emoticon खास
WhatsApp वरही पाळतो नियम, होऊ देत नाही संघाचा ह्रास
प्रार्थनेची येता वेळ प्रार्थनेचा फोटो share करतो
“वी किरः” चा message आल्यावरच group मधून बाहेर येतो
छानच झालं WhatsApp च्या शाखेचा शेवटी झाला उदय
प्रतिदिन mobile वर वैश्विक शाखा, बोला “भारत माता कि जय !!!”

आडवा प्रणाम
स्वयंसेवक : सारंग जयंत कुसरे