अस्थिर पारा
विचारांचा मारा
वेळेचा पहारा
दिमाग खराब…

गोंधळ दिल्लीत
चर्चा गल्लीत
त्याचे फलित
दिमाग खराब…

वेगळे पंथ
सगळे स्वतंत्र
त्याचे रवंथ
दिमाग खराब…

नवरा-बायको
दोघंही सायको
फिर देखनेकाच कायको
दिमाग खराब…

साकळले रक्तं
तुझ्यासाठी फक्तं
दुसऱ्याची तू भक्तं
दिमाग खराब…

भकास वेळ
कवितेशी खेळ
विचारांची भेळ
दिमाग खराब…

K Sarang