बोलणे दोघांचे असता सुरु
खुपसे नाक अकारण जो माथेफिरू
लाविसी अपुले जो अनाठाई वितर्क
तो मुर्ख

संगीताचे बोल पडत असता कानी
लय, ताल अन सुरांचे बरसता पाणी
विचारी जो राहतो इतर कामात गर्क
तो मुर्ख

वाद-विवाद करणे एका सिमेसी बरे
पण नको की हो हट्ट “माझेची खरे”
हट्टापायी जो शोषतो नात्यातील ओलाव्याचा अर्क
तो मुर्ख

सुगंधाचे फक्त घ्यावे अनुभव
नाही समजले काव्य तर लयिचे वैभव
पण अतर्क्य गोष्टींचे जो शोधिसी तर्क
तो मुर्ख

कविता ही वाचून अंतरी होईल हर्ष
लक्षणे ही टाळून करू स्वोत्कर्श
ठरवुन देखील स्वभावी ज्याच्या न दिसे फर्क
तो मुर्ख

K Sarang