येतोस होऊनी वाऱ्यावरती स्वार
घालतो फुंकर अलगद दुखावर अलवार
पडतो थेंब, होते खळी तयाची गाली
मृदगंधतो चौफेर ,पडता दुसरा थेंब ही खाली
ठाऊक मझला, वाऱ्यासंगे परत फिरुनी एकवार
घटका संपताच तू आल्यापावली निघणार
घटका जरी ना लांब तरी ती होऊ दे इतुकी मोठी
परतून येईतो तू , हसू राहील सदैव माझ्या ओठी

K Sarang