रेषेच्या पार आहे शांत संथ पाणी
रेषे अधीच आहे इच्छा सांगण्या कहाणी
सिमेपरी पोहोचाया हवी आंतरिक दृष्टी
सिमेपार भासे जणू वेगळीच सृष्टी
न दिखावे खोटे न उपरी वैभवमाया
कृत्यावर प्रत्येक राही प्रामाणिक छाया
रेष ती गाठण्या न हवी शिकवण अचूक
अवचित समयी शुध्द मना ती भेटते आपसुक

K Sarang