दुखरी नस हळू हळू बधिर झाली
अन ज्योत विझायला खूप खूप अधीर झाली
सुख बरसले तरीही आता ती भिजणार नाही
अन वारा जोरात आल्याशिवाय ज्योत काही विझणार नाही
ठोका मात्र नियमाप्रमाणे येतो तिच्या दाराशी
वाराही म्हणतो ज्योतीस “मैत्री कर ना माझ्याशी!”
आधी बधिर असून उष्ण, पण आता तर सगळा गारवा आहे
ज्योत गेली आहे विझून, शेजारी शुभ्र शांत पारवा आहे

K Sarang