आधी वारा, मग ज्योती नंतर बरसात
आधी किनारा, मग रेती नंतर समुद्रलाट
आधी अळी, मग कोश नंतर फुलपाखरू जिवंत
आधी कळी, मग पुष्प नंतर निर्माल्याने अंत
आधी बीज, मग देह नंतर अस्थी मुठभर
आधी जन्म, मग मृत्यू पण आत्मा अजरामर
आधी मी अळी, मग मी कळी नंतर मी किनाऱ्यावरील लाट
आधी मी वारा, मग मी पुष्पं, नंतर होणे काय याची बघतोय मी वाट

K Sarang