प्रयोजनाचा शोध सुरु झाला
आणि शिवलेले सगळे समज उसवू लागले
धागा कदाचित कच्चा होता म्हणून
पण याच तर धाग्याने इतके दिवस
फाटलेले, उसवलेले शिवत होतो मी
आजपर्यंत जे मी लपवू बघत होतो
अखेरीस ते बाहेर आलेच आणि नुसते नाही
तर अगदी विस्फोट व्हावा तसे
असो… आता प्रयोजनाची नवी सुई हाती लागली आहे
त्यात फक्त धागा ओवताना त्रास होतो आहे इतकच
पण आता वीण घट्ट आणि एकरूप होईल कदाचित… 

K Sarang