एकशे आठ तर झाले पण अचूक नेम काही लागला नाही
आणि माहुताच्या मनाप्रमाणे गज काही वागला नाही…
शुन्यातल्या स्थिरतेची वाट काही सोपी नाही
येईल काबुत आज न उद्या गज काही इतका कोपी नाही…
प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळते
हळू हळू का होईना पण गजास माहुताची भाषा कळते…
आताशा तर चौपन व्हायच्या आताच स्थिरतेचे कुलुप उगडते
अन कर्णस्पर्ष न होता देखील गजास माहुताची भाषा कळते…

K Sarang