देही उठती शहारे
नेत्री पाणी पहारे
वळून बघता मागे
भेटलेले किनारे

अशांत मध्य सागरी
दिशाहीन नौकाविहारी
वादळांशी करून मैत्री
घाव झेलतो जिव्हारी

जखमांची गम्मत भारी
शत्रूस ठेवून विचारी
जाती पळून वेदना
व्रण ठेवुनिया शरीरी

निद्रेस ज्या बेटावर
टाकतो अंग तटावर
स्मृतीस मुठभर माती
जपतो मन:पटावर

फिरता भवसागरात ऐसे
अनमोल क्षणांचे पैसे
चिमुटभर त्या मातीतून
निर्मिले स्म्रुतिपर्वत जैसे

अखेरच्या किनारी
एकची इच्छा मम अंतरी
निर्वाणास सोबतीस असावा
तो सुखद क्षणांचा गिरी

K Sarang