पाठ टेकताच जो जातो हवेत
नकळत थेट निद्रादेवीच्या कवेत
निजतो तेथे ठेवून घोरणे मुखी
तो सुखी…

पडता झरझर पाणी खाली
भिजणे येते ज्याच्या खयाली
सोबतीस येते ज्यास चहाची हुक्की
तो सुखी…

बाळासमोर जो होतो लहान
खेळण्या त्याच्याशी हरवतो भान
वय विसरण्याची जो करतो चुकी
तो सुखी…

निंदा नालस्तीस न घाबरता
प्रामाणिक मनाने कारभार करता
जगतो अभिमानाने न होता दु:खी
तो सुखी…

वाईटातले चांगले जो शोधून
चांगुलपणावरच विश्वास ठेवून
जो समजतो स्वतःस लकी
तो सुखी…

K Sarang