शक्यतांच्या पाऊसात
मी रेनकोट घालून भिजलो…
अन पुर्णीमेच्या चांदण्यात
अंधाऱ्या खोलीत निजलो…
संध्यांचा महापूर
आणि मी किनारी कोरडा…
सगळच कसं निश्चल
म्हणून दैवावर ओरडा…
पाहून डोंगर मोठा
एका पाऊलाची चोरी…
केवळ एका पाऊलाचे धाडस
जाशी यशाच्या शिखरी…

K Sarang