नाण्यास बाजू दोन
जिंके कुणी तर हरे कोण
निर्णय सर्वस्वी हाती
तयाच्या…!

देठ जरी गार हिरवे
बसती पानांवर पारवे
तरीही पडे गळून हाकेने
तयाच्या…!

आनंदाचे अश्रू डोळा
नंतर होते दुःख गोळा
चक्राचे दोर हाती
तयाच्या…!

पंककुंडात फुलते कमळ
कोळश्या खाणीत हिरा दुर्मिळ
घडावे कोणी कुठे मनी
तयाच्या…!

येणे अन जाणे एकटेच
मधल्या काळात सगळे पेच
विश्रांतीस अखेरीस जाणे आश्रमी
तयाच्या…!

K Sarang