रावणासारखी जर प्रत्येकाला दहा डोकी असती तर
स्वाभाविकरित्या मेंदूही दहा असले असते मग
म्हणजे मग एक मन विरुद्ध दहा मेंदू…:-)
किती गफलत झाली असती
इथे एक मन आणि एक मेंदू यांच्या द्वंद्वातच
टकलावरचे केस अकाली जायला लागले आहेत
तिथे रावणानी कसे बरं सांभाळले असेल स्वतःला ?
किंबहुना दहा मेंदू होते की काय म्हणूनच
एका मनाचं तिथे काही चाललं नसणार कदाचित
आणि फक्त मेंदूंनी राज्य केलं असणार रावणावर
पण त्याचे परिणामही त्याला भोगावे लागले
याचाच अर्थ असा की जर जास्त मेंदूनी विचार केलात आणि
मनाकडे दुर्लक्ष्य केलं तर मात्र रावण व्हायला वेळ लागणार नाही…:-)

Happy Dusshera to all the readers…! (24th October 2012, London)

K Sarang