हार तरी कशी मानू मी, वाट अर्धी सरली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे

संकटांचे वार पचविता इथवर आलास त्याच्या कृपेने
वाचवत तुला तो या मार्गात भेटत होता बहु रुपेने
अगम्य सांकेतिक भाषेने त्याच्या संपूर्ण वाट भरली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे               (1)

मनोबलाचा अस्थिर पारा फक्त आहे तुझ सांभाळणे
केवळ कल्पित भयपटात जास्त वेळ न रेंगाळणे
समजावीत स्वतःस मान आता होकारार्थी हलली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे               (2)

भविष्यातल्या प्रवासाविषयी नकोच मनन आणि चिंता
तो न्हवे आपला प्रांत त्यासी सर्वस्वी उचित भगवंता
नेहेमीच निकोप मनाने केल्यास कृती नकारार्थी सेना हरली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे               (3)

लढून संकटांशी कणखर मी अधिक होईलही कदाचित
किंबहुना संकटच असतात आपल्या दुष्कार्मांचे प्रायश्चित
संकटांची ही दुहेरी वागणूक आता मी चांगलीच हेरली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे              (4)

जिंकणे व हरणे नाण्याच्या केवळ दोने बाजू
प्रयत्नांती जर का हरलास तर मात्र नको लाजू
महती प्रयत्नांची सांगण्या ही कविता स्फुरली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे              (5)

हवा फक्त जिंकण्याचा ध्यास आणि तसाच प्रयास
चक्षुंपुढे केवळ जिंकल्यानंतरच्या दिव्यांची आरास
त्या दिव्यांच्या प्रकाशाने आत्ताच मती माझी गहिवरली आहे
आता मागे न बघता जाणे पुढे , वाट अर्धी उरली आहे              (6)

K Sarang