आवडीचे डोके बरोबर वर येतेच,
व्यावाहारचे डोके कितीही जरी अर्थकारण करत असले
तरीही आवडीचे डोके मात्र भावनांचे राजकारण करते
पैसा आणि भावना यात नेहेमी भावनेचे पारडे जडच राहिले आहे
पण आवडीच्या डोक्याने मात्र तेव्हाच धुरा सांभाळावी
जेव्हा व्यवहाराचे डोके अर्थकारण करून पिकले आहे
आणि उदरभरणासाठी लागणाऱ्या चार वस्तू जमवून आहे
कारण आवडीच्या डोक्याकडून उदरभरण शक्य होईलच असे मात्र नाही
म्हणून जरीही आवडीचे डोके कितीही वर येत राहिले
तरीही पहिले व्याहाराच्या डोक्याने विचार करून मगच
आवडीच्या डोक्याचा मेंदू “संपूर्ण” कार्यान्वित करावा…!

K Sarang