प्रकाशाच्या काही काचांचा एक चष्मा मी बनवला माझ्या अंधाऱ्या खोलीत
तो चढवल्यावर मात्र माझा मीच दिसू लागलो मला आंतर्बाह्य
मला खरं तर बाहेरच्या अंधकाराचा कंटाळा आला होता
आणि म्हणून तो चष्मा चढवून मला स्वतःपुरता का होईना, तो घालवायचा होता
पण झालं नेमकं उलटच,मला अंधारलेला मीच दिसू लागलो त्यातून
बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला, जाणूनबुझून माहिती असलेल्या गोष्टींचा अर्थ कळला
चष्म्यातून सगळं अगदी स्पष्ट दिसत होतं, एका क्षणी वाटलं चष्मा काढून भिरकावून द्यावा
नकोच बघावा तो अंधकार आणि स्वतःच्या त्या खोट्या प्रतिमा आणि गढूळ सावल्या
पण मग स्तीरवलो थोडा आणि ठरवले की हा चमत्कार वाया नाही जाऊ द्यायचा
ज्योत कुठे लावायची ते नीट ओळखून, त्या सर्व ठिकाणी एक-एक समई प्रज्वलित केली
स्वतःला पूर्ण प्रकाशमान करून मगच मी तो चष्मा काढला आणि बघतो तर काय “अहो आश्चर्यंम!”
माझी अंधारलेली खोली संपूर्ण उजळून निघाली होती आणि बाहेर देखील लक्ख ऊन पडले होते…!

K Sarang