सगळ्या चिंतांच्या मुसक्या आवळून, त्यांना बाहेर काढून
यंदा त्यांचीच होळी करायची म्हणतोय
नाही तरी लाकडं जाळल्यानी प्रदूषण होतच
तसं चिंतांचे काही ओंडके जाळले कि होईल अजून थोडं
पण या प्रदुषणानंतर मात्र माणसं अजून शुद्ध होतील आंतरबाह्य
कलुषित मनं निर्मळ होतील कदाचित
आणि मोकळा प्राणवायू शुचिर्भूत करेल अस्तित्वाला
मग सभोवतालच्या कुठल्याही प्रदूषणाने
इतका त्रास नाही होणार जितका होतोय आत्ता
यंदाच्या होळीला तसा अजून अवकाश आहे
पण तो पर्यंत सगळ्या चिंता हाती लागल्या पाहिजे
याचीच आता चिंता लागून राहिली आहे…! 🙂

K Sarang