दोष कुणाचाही न्हव्ता..
फक्त इतकेच की कोणी तरी वादळवाटेत होतं…
याला वाटत होतं की हा आणि तिला ती..
पण म्हणून दोघांनीही वेगळीच वाट निवडली…
त्या वाटेवर तरी दिसेल प्रकाश या आशेवर..
पण ज्यांची दृष्टीच धूसर झाली आहे…
त्यांना प्रकाशाच्या वाटा तरी कशा कळणार..
दोघांच्याही वाटेत प्रकाशाची किरणे आलीत, नाही असं नाही…
पण अंधाऱ्या कंदिलाच्या सावलीत कळलं नाही इतकच..
वाट सरत गेली, गावच्या वेषी ओलांडत गेले दोघंही…
आता वादळवाटेतले उरले आहे फक्त वादळ अन तेही आसमंतात..
टपलेले, कुणाची तरी वाट अडवण्यासाठीच जणू बसलेले…

Today is 9th October 2012 and this day will always be special for me in my entire life. The reason for this is today i could compose my first ‘Muktachand’ kavita. The moment this was completed today, i was less than short of being euphoric. I thank The Almighty a trillion times for bestowing upon me the thoughts that i could present it in the manner that i have, in this poem. Parat ekda…Ganpati Bappa Morya…Gajanan Maharaj ki jai…Jai Shri RAM…!

K Sarang