काही चित्र असतात ती आवडतात सगळ्यांनाच
काही फक्त स्वतःपुरती, स्वतःशीच अन स्वतःलाच
काही चित्रांची रंग संगती वेगळी
तर काही बेरंगी तरीही भावतात सगळी
काही मात्र काहीच न बोलून सुद्धा खूप काही सुचवतात
तर काही खूप बोलून सुद्धा प्रचंड निरर्थक वाटतात
काही चित्र तर पांगळी सुद्धा असतात
तर काही धडधाकट असून सुद्धा सपशेल बसतात
काही चित्र सरळ मार्गी तर काही जबरदस्त गूढ
तर काही चित्र पाशवी कायम उगवतात सूड
मला मात्र माहित असते प्रत्येक चित्राचे खरे नाव अन गाव
“शेवटी” चित्रकारासमोर नाहीच न लपणार चित्राचा खरा स्वभाव !!!

K Sarang