भूगोल शिकलो अन शिकलो इतिहास
भूमिती अन रिचवले गणितास
पण नाही शिकलो शाळेत कि
माणसात कसे वाचावे विषयास
भौगोलिकदृष्ट्या कुणी भरमसाठ
पण लक्ष कोण देतो इतिहासात
भाषा कुणाची सुमधुर गोड
पण मनात जुने रक्तबंबाळ खोड
कुणाचे गणित चोख अन पक्के
पण अती हिशोबामुळे नात्यास धक्के
शाळेत पैकीच्या पैकी विषयात
पण खरच उतरले का ते आयुष्यात ??

K Sarang