बेहोष रात्र आणि अधांतरी दिवस
कुठल्या देवाला घालायचा साक्षात्कारी नवस
कुठला तो मंत्र अन कुठला तो जप
कुठला तो श्लोक ज्याचा सगळ्यात जास्त आहे खप
श्लोकात रमावे अन व्यग्र व्हावे सेवेत
का नीरेत बुचकाळून थेट जावे हवेत
नीरा काय किवा श्लोक काय
मोक्ष मिळवण्याचे विरोधी उपाय
शेवटी आपली चव अन आपली आवड
निम्नलिखित दोघांतून निदान एक तरी निवड…!

K Sarang