परत पाण्यात पडला मासा
मिळताच श्वास गिळला दिलासा
सहजची झाले पुनर्वत सगळे
जुनेच तरीही वाटले वेगळे
आता न होते जाळे जरीही
होते काहीतरी निराळे तरीही
पश्चात माझ्या न अडले काही
नसता मी न अवघडले काही
तेच दिन अन तेच पाणी
तीच निशा अन तीच कहाणी
धडा काही मज आज ऐसा मिळाला
पुनर्जन्मात का असेना पण आज कळाला
क्षुद्र आहे तुझी सारीच महती
संपला तरीही तू सुरूच राहील जगती
अव्याहत चालणार हे आहेच खरे
परतून पुन्हा न येणेच बरे…

K Sarang