आठवणीत माझ्या जेव्हा कंठ तुझा दाटू लागला
त्या कृष्णवेड्या राधेस आता हेवा तुझा वाटू लागला
वेड होते राधेस कृष्णाचे जरी, पण न्हवते तुझ्यापरी
वेडी प्रीत पाहता तुझी मझ मीच कृष्ण भासू लागला
आठवणीत माझ्या जेव्हा कंठ तुझा दाटू लागला
वनवासातील सीतेस आता कळली जेव्हा तुझी प्रीत
नीर नेत्रातले ओघळले बघता प्रीतीची ही उत्कट रीत
भक्तिरसात भिजून तुज्झ्या मझ मीच राम भासू लागला
आठवणीत माझ्या जेव्हा कंठ तुझा दाटू लागला
उच्च कोटीच्या या प्रेमास का खरेच लायक आहे मी
शुद्ध सात्विक आराधनेस का खरेच आहे पात्र मी
ऐस्या प्रेमाच्या प्राप्तीचा प्रेमळ भार मनास वाटू लागला
आठवणीत माझ्या जेव्हा कंठ तुझा दाटू लागला

The only thing that i wish to write about this poem is, that the first four lines of this poem were written way back in 2001, and then suddenly today (20th September 2012) after almost more than 11 years, i got to complete this poem. This is one of the most happiest moment for me !!! Thanks Lord…!

K Sarang