तारेवरची कसरत करता
पालथ्या घड्यावर पाणी भरता
लोटली अनेक वर्षे व्यर्थ
न देताच वयास काही अर्थ
गाडा सरकावा म्हणून तळमळ
कंठस्थ उदर तरीही अशक्य जळजळ
तळेच आता कदाचित जाईल विरून
न येतील पुन्हा भाबडे पक्षी फिरून
कुठवर रेटावा हा प्रपंच
स्वतःच सांभाळावा आपला रंगमंच
अर्थार्जनास निघालो होतो जरी
तपासून पाहावा की काही अर्थ आता लागतोय का तरी…

K Sarang