का मज वाटे ऐसे की मी “स्वतःच” पळतो आहे
दिसताच दिशा अनेक मी अचूक वळतो आहे
का मज वाटे ऐसे की तपस्या “मी” करता खूप
अशक्यप्राय यशाचे मग दिसते मजला रूप
का मज वाटे ऐसे की सर्व मिळवले “मीच”
प्राप्तीस माझ्या कारणीभूत नाही दुसरे कुणीच
का मज नाही कळत की “मी” फक्त “लेखणी” तयाची
कथेत लिहिल्या जाईल तेच जे येईल “त्याच्या” मनाशी

K Sarang