नाते कदाचित विणतात वरती
परिणाम भोगण्यास तयार धरती…
नात्यांची पण गम्मत भारी
न ठरवताच चिकटतात सारी…
अशक्य असे हे जरतारी काम
कोणासाठी खाली वर कोण गाळतो घाम…
नाते आणि नशिबाचे जवळचे नाते
नशिबात सोने तर लाख मोलाचे खाते…
मैत्रीचे, प्रेमाचे तैसेच नाते देवाशी
मग देवच तर नाही न तोडत नाते नास्तिकाशी…

K Sarang