नकळत खेळाचा शेवट व्हावा
पैलतिरीचा सूर्य दिसावा…
तिमिराची सुरवात गोड व्हावी
क्षणार्धात केशरी किरणे दिसावी…
प्राक्तनाचे भोग भोगून सारे
आनंदाने उठावे सारे पहारे…
लांबच्या पल्ल्यास सोबतीस असावी
अमृत क्षणाची पाखरे दिसावी…
आवर्तनास होण्या पुन्हा प्रयास
न जाणो कुठल्या रुपात पुन्हा प्रवास…

K Sarang