धुतल्या तांदळाचे कोणीच नाही
तरीही शोधतो दिशा दाही…
कोण सत्याच्या आस-पास
त्यासवे होण्या आपुला प्रयास…
कोण खरे वा खोटे कोण
गोष्ट एक वेगळे द्रुष्टीकोन…
वाट आपली निवडण्या संभ्रम
अखेरीस गर्दीत लागतो क्रम…
गर्दीचीही निराळी तत्वे
ऐकावे फक्त नेत्यांचे फतवे…
बरोबर वा चूक हे परिणाम सांगेल
चुकले तर गर्दी आपोआप पांगेल…
मार्ग चुकलाच जर, तर मनी क्रोध
नवीन सत्याचा पुन्हा नवीन शोध…
मोक्ष न मिळणे चक्रात अडकून
गर्दीचे होऊ फक्त भावना भडकून…
ऐकून अंतरीचे निरपेक्ष बोल
सत्य-असत्याचा राखशील समतोल…
निरभ्र मनाने केल्यास कृती
वरून देवही घालतील पूर्णाहुती…

K Sarang