आई माझी दुदु बाटली, बाबा CD प्लेयर
आजी मस्त गोष्टीचं पुस्तक, आबा उबदार गादीचा लेयर

लागली मोठी भूक
की मोठ्याने रडायचे खूप
मग दुदु बाटली येते धाउन
मिटक्या मारत मग प्यायचे दुध चाऊन चाऊन…!

पिऊन दुध भरले पोट
की होतो मग एनर्जी चा स्फोट
गोष्टींचं पुस्तक मग खुप गोष्टी सांगतं
अगम्य तरीही अर्थपूर्ण हुंकारांनी पूर्ण घर दणाणतं…!

मग होऊ लागतं बोअर,
ओठी येते उलटी चंद्राची कोर
तितक्यातच मग CD प्लेयरवर लागतात गाणी
सगळी गाणीच जणू सांगू पाहतात मला झोपेची कहाणी…!

दहा गाण्यातच CD प्लेयर अशक्य पेंगतो
मला झोपावायचा त्याचा प्लान तिथेच बेंगतो
नकळत मग गादी घेते हळुवार कुशीत
पापण्या पर्यंत आलेली झोपही आता असते खुशीत…!

झोपी जाऊन झाले असतात जेम-तेम तीन तास
परत सुरु होतं तेच सत्र, पहिले पाढे पन्नास…!

This poem is all about the baby telling her routine and about the most important elements in this stage of her life.She now just recognize us all, through interactions that we have with her. This poem is nothing but baby’s view of all the people around her…objectively…!

K Sarang