Tags


नभ फाटून जो आला आहे, सर-सर कोसळत
पडता धरणीवर, हवेत अत्तर मिसळत…

यास म्हणती पाऊस, याची नानाविध रूपं
वयाच्या प्रत्येक वळणात, तुला तो आवडेल खूप…

“येरे येरे पावसा” म्हणत, प्रथम पावसात भिजशील
नभी चमकता वीज, घाबरून कुशीत शिरशील…

विजेची जाईल भीती, अजून थोडी मोठी झाल्यावर
मग खेळशील चिखलात, पाऊस जोऱ्याने आल्यावर…

शाळेतला पाऊस, जाईल रेन-कोटवरून वाहून
कधी आभ्यासाच्या ओझ्याखाली, जाईल तूझं भिजायचा राहून…

मग फुटेलग पालवी, पाऊस वेगळाच भासेल
नभी नसता देखील, सर्वत्र इंद्रधनुष्य दिसेल…

हा पाऊस धोक्याचा, वेडा येईलग पूर
असलाच जर का सखा, अंतरी असेल त्याचाच ग सूर…

लग्नाची येता वेळ, जागा बदलेल ग पावसाची
नयनी येतील दाटून ढग, अन सर येईल ग आसवाची…

त्या दिवशी बाळा, बाबा मग असा काही भिजेल
तोपर्यंतचे सगळे पावसाळे, तुला त्याच्या डोळ्यात दिसेल…

कालान्तारापासून पावसाचा, असाच आहे ग खेळ सुरु
तळहातावर झेलत थेंब, पहिल्या पावसाशी चल सई,तुझी दोस्ती करू…

As mentioned in the heading, this poem is all about me introducing my daughter to her first RAINFALL of life. This is a dialouge between a father and a new born daughter, who is introducing RAIN to her and also telling her the role that RAIN will play in her life and how she will experience different colours/moods of RAIN in different walks/times of life.

K Sarang