Tags


ह्यात काय त्यात काय !

“ह्यात काय त्यात काय” म्हणणार्यानपैकी नाही आम्ही लोक
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे आम्ही काही लोक…

पोटभर जेवल्यावर मस्त तृप्त ढेकर
पाई चढून आल्यावर सिंहगडावरची पिठलं आणि भाकर
गच्च भरल्यावर पोट वरतून आईसक्रीमचा मारा
आमरस पोळी झाल्यावर दुपारी मस्त कूलरचा वारा
हसू येणार असेल तर खरीही वाटून घेऊ तुम्ही फेकलेली फोक***…  ( फोक : थाप)
“ह्यात काय त्यात काय” म्हणणार्यानपैकी नाही आम्ही लोक…(1)

गणपतीच्या मिरवणुकीत ढोल ताश्यावर नाच
अमरनाथच्या यात्रेचा आनंदाने स्वीकारू जाच
वारीतल्या लोकांसोबत लावू ब्रम्हानंदी टाळी
भजनात दंगून जावून लावू अबीर-बुक्का कपाळी
आत्मिक तृप्तीच्या ओलाव्यासाठी गाठू आधाय्त्माचेही टोक
“ह्यात काय त्यात काय” म्हणणार्यानपैकी नाही आम्ही लोक…(2)

लावणीच्या कार्यक्रमात मस्त उडवू फेटे
सवाई गंधर्वाच्या तिकिटासाठी घालू चार ठिकाणी खेटे
आवडत्या नटाच्या कार्यक्रमाला भरभरून देऊ दाद
सुरेल गाण्याच्या कार्यक्रमाला अगदी नेटाने देऊ साद
चक्रवाढ व्याजदराने आनंद देणारे पाळू आम्ही शौक
“ह्यात काय त्यात काय” म्हणणार्यानपैकी नाही आम्ही लोक…(3)

आनंद कसा शोधावा या साठी नाही कुठले शिक्षण
आनंद कशाने मिळेल याचे मनी असावे मिश्रण
नवनवीन अनुभवास नेहेमी स्वतः तयार असावे
जरी लागले फसावे तरीही आनंदून हसावे
दुखाने भरले तरीही हसून साजरा करतो आम्ही “आयुष्य” नावाचा जोक
“ह्यात काय त्यात काय” म्हणणार्यानपैकी नाही आम्ही लोक…(4)

This poem is dedicated to all those so called “SPOILSPORTS” who will instantly kill your enthusiasm or your happy energy immediately after you share your joy or experience that made you feel on the top of the world. For e.g:

Example 1:

You: “Hey it was so much fun today doing an early morning trek to Sinhagad. It was really refreshing”

SPOILSPORT1:”Tyat Kay…Weda…Instead of sleeping long hours on Sunday morning, you went trekking…he he…(sarcastic laugh)”

You: Cursing the persons attitude…obviously in the mind…!

Example 2:

You: “Boss i just couldnt stop myself from dancing on Laxmi road that day during the ganapati procession…it was really divine…”

SPOILSPORT2: “Tyat kay…i think thats too childish of you…look at your age and what you are doing…”

You: Just pity his thoughts…obviously in the mind…!

There can be many more examples that you also must have experienced in your day to day life.

Somebody might argue that, “People have the freedom to express the feelings that they have, be it good or bad. It does not mean that if you like something then others will also like the same.”

I completely agree with the fact that this is true. But my objection is to the way you communicate it. I mean if someone is telling you from the bottom of heart that he just had a wonderful experience of something and if suppose you do not enjoy that thing, then atleast do not dampen the spirit of the other person by your negative vibes. And thats the whole point.

K Sarang