पोरगं IT त आहे म्हणजे “ऐटीत” नव्हे !

क्लायंट जर म्हणाला कि माझा साफ करायचा आहे संडास
एका श्वासात धाडून देईल तुम्हाला कंपनी बिंदास
कारण कंपनीचं नातं केवळ आहे पैश्यासवे
पोरगं IT त आहे म्हणजे “ऐटीत” नव्हे !

दुरून दिसायला छान दिसतात हिरवेगार डॉलर
काम सगळच हमाली फक्त म्हणायचं व्हाइट कॉलर
असं मीच म्हणत नाही, हवं तर करून घ्या सर्वे
पोरगं IT त आहे म्हणजे “ऐटीत” नव्हे !

पगार आहे मोठा म्हणून कर्जाचा मोठा डोंगर
उंद्रावानी पगाराच्या मागे EMI रूपी मांजर
महिन्याच्या अखेरीस जेव्हा दिसतात भोवताली काजवे
पोरगं IT त आहे म्हणजे “ऐटीत” नव्हे !

IT तील मंडळी म्हणजे फक्त बाहेरून HI-FI
थोडसं वाजवून बघितलं तर आत काहीच नाय
या लोकांचा प्रत्यक्ष जगाशी काही संबंधच नव्हे
पोरगं IT त आहे म्हणजे “ऐटीत” नव्हे !

I came from NON-IT field and later joined the IT bandwagon. Thats the reason i could easily take a distant view of the situation of the people in IT wrt to the people in NON-IT. I found out that though this field seems glamourous / posh from outside, but reality is something else. This poem came out as result of my so called more than 5 years of experience in IT.
Though now i am an IT professional, but i still pity the situation here and most importantly the fake attitudes with which (most) IT professionals behave. Always being in the virtual world, I still feel that they lack the exposure of real world.
This poem is dedicated to all my poor (not moneywise, but some other REAL experience wise) IT friends, who are happy in their own wonderland…! NOM 🙂

K Sarang ( IT Professional :-))