का कुणास ठाऊक पण सुखाशी भांडतो आम्ही…

भरपूर जेवण, मस्त गाढ झोप,
छानशी नौकरी , दारी पैश्याचं रोप,
सुख म्हणजे नक्की काय, असे प्रश्न मांडतो आम्ही
का कुणास ठाऊक पण सुखाशी भांडतो आम्ही…

धड-धाकट शरीर, न कुठला रोग
पंचेन्द्रीयातून घेतो श्रुष्टीचा उपभोग
निरर्थक विचारात ठराविक वेळेतले काही क्षण सांडतो आम्ही
का कुणास ठाऊक पण सुखाशी भांडतो आम्ही…

छानसं घरदार, नीटनेटका संसार
मोठ्यांचा आम्हाला आणि आमचा त्यांना आधार
तरीही सुख म्हणजे काही और या विचारातच नांदतो आम्ही
का कुणास ठाऊक पण सुखाशी भांडतो आम्ही…

नशिबी सगळ्यांच्या नसते ऐसे सुख
प्रत्येकालाच असते कशाचीतरी भूख
विचारी त्यांनाच ठेवून जगावे असे फक्त म्हणतोच आम्ही
का कुणास ठाऊक पण सुखाशी भांडतो आम्ही…

सुखाची न व्य्ख्या कुठली, न काही रूप
मानण्यातच सुख मानिले तर दरवळतो सुगंधी धूप
या विचाराशी येऊन आता थांबतो आम्ही (म्हणजे मी :-))
का कुणास ठाऊक पण सुखाशी भांडतो आम्ही…

This poem is inspired by reading the following article: http://www.thehindu.com/​opinion/columns/Harsh_Mander/​article2882340.ece

K Sarang