कुणास आहे ठाऊक

अजुन किती श्वास उरले कुणास आहे ठाऊक…
अजुन किती लांब नियतीचा घास कुणास आहे ठाऊक…

हसण्याचे साठे किती अन अश्रुंचे किती
दुःखाचे डोंगर किती अन अतीव हर्षाचे किती
ऐसे काही प्रश्न पडताच होतो मी भावुक …
अजुन किती श्वास उरले कुणास आहे ठाऊक…

जगलो तेच जीवन की अजुन काही जगलोच नाही
भोगालो तीच ‘सुख-दुखे’ की अजुन काही भोगालोच नाही
गोंधळतो अन म्हणतो “पुढचे पुढेच पाहुत…”
अजुन किती श्वास उरले कुणास आहे ठाऊक…

क्षितिजाच्या पलीकडले कधी का कोणा दिसले आहे
या इथेच होड़ी गाठणार तळ, कधी का कोणा समजले आहे
काळ उभा ठाकण्यापूर्वी आनंदानेच राहूत…
अजुन किती श्वास उरले कुणास आहे ठाऊक…

आधीच लिहिले त्यावरी मुकाट आहे चालत जाणे
ठरलेल्या चाली वर म्हणत जावे आपण आपले आनंदी गाणे
उरले जितके क्षण तयाना, घेउन प्रेमाने बाहुत…
अजुन किती श्वास उरले कुणास आहे ठाऊक…

अजुन किती लांब नियतीचा घास कुणास आहे ठाऊक…

Inspired by all those unexpected/unforeseen events, news, experiences, that forces you to think that TODAY IS THE ONLY DAY AND THIS IS THE ONLY MOMENT !!!
K Sarang